Thursday, September 28, 2023

अनागारिक धम्मपाल आणि पाली दिवस

 

   अनागारिक धम्मपाल आणि  पाली दिवस 


17
सप्टेंबर रोजी 'पालि भाषा  गौरव दिनं' अर्थात पालि भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. अनागारिक धम्मपाल यांची 159 वी जयंती आहे. अनागारिक धम्मपाल यांच्या जयंती निमित्त 'पालि डे' हा दिवस साजरा केला जातो. अनागारिक धम्मपाल यांचा जन्म 17 सप्टेंबर 1864 मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे झाला ते अत्यंत श्रीमंत कुटुंबातील होते. त्यांचे लहानपणीचे नाव डॉन डेव्हीड असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव डॉन केरोलिस हेवावितरणे व आईचे नाव मल्लिका धर्मागुणवर्धने असे होते. डॉन डेव्हिड यांच्या बालजिवनाला आधार देण्यासाठी  त्यांची आई मल्लिका देवी रात्रंदिवस झटत होती. व ती बौद्ध संस्कृतीला मानत होती. डॉन डेव्हिड हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते त्यांनी शाळेत उत्तम प्रगती केली होती. मल्लिका देवी स्वतः नित्यनेमाने बौद्ध धर्माचे धडे देऊन डॉन डेव्हीड यांचे जीवन घडवित होती. त्याच्या नैतिक आचरणावर ख्रिश्चन शाळेतील अध्यापक वर्ग अगदी खुश होता. बायबलवर डेव्हीडचे प्रभुत्व असल्यामुळे त्या शाळेतील अध्यापक वर्ग त्यास मोठ्या प्रेमाने प्रार्थनेत सहभागी करून घेत असत. त्याचे उच्चार अगदी सुस्पष्ट आणि वाणीत मधुरता होती. डॉन डेव्हीडने बायबल पाठ केले असले तरी त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर कधीच पडला नाही. 

    डॉन डेव्हीड यांच्या सुरवातीच्या  जीवनात मेडम मेरी ब्लवत्सकी आणि कर्नल हेनरी ऑलकॉट यांचे खूप मोठे योगदान आहे. सन 1875 मध्ये मेरी ब्लवत्सकी आणि कर्नल हेनरी ऑलकॉट यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये थियोसोफिकल सोसायटीची या दोघांनी बौद्ध धर्माचे खूप अध्ययन केले नंतर 1880 मध्ये ते श्रीलंका येथे आल्यावर ते स्वतः बुध्दिष्ट झाले तसेच भिक्षुंचे चिवरही यांनी धारण केले. ( भिक्षु झाले ) त्यांनी श्रीलंकेत 300 च्या वर शाळा काढल्या. बौद्ध धर्मातील शिक्षणासाठी फार मोठे काम त्यांनी केले. डेव्हिड त्यांच्यामुळे खूप प्रभावित झाले. बालक डेविड यांना पालि शिकण्याची प्रेरणा त्यांच्यामुळेच मिळाली त्यानंतर डेव्हिड ने आपले नाव बदलून 'अनागारिक धम्मपाल' असे ठेवले. 1891 मध्ये अनागारिक धम्मपाल यांनी भारतात स्थित बोधगया महाविहाराची यात्रा केली होती. जिथे सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती. संपूर्ण भारताचे अवलोकन त्यांनी केले. भारताची बौद्धधम्म आणि बौद्ध तीर्थ स्थळांची दुर्दशा पाहून यांना खुप दुःख झाले.  त्यांनी विश्वातील काही बौद्ध  देशात पत्र लिहून त्यांनी सन 1891 मध्ये महाबोधि सोसायटीची स्थापना केली. धम्मपाल यांनी महाबोधि विहार तसेच दुसरे तीन प्रसिध्द बौद्ध स्थळ स्थापन करणासाठी मागणी केली होती त्याचाच परिणाम कि आज महोबाधि विहारामध्ये बौद्ध लोक जाऊ शकत आहेत. तसेच अनागारिक धम्मपाल यांचा प्रयास होता की, कुशीनगर जिथे तथागत यांचे महापरिनिर्वाण झाले होते. तिथे सुद्धा बौद्ध दर्शनीय स्थळ बनले.

   बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार करून धम्म पूनरर्जीवीत करणारे वंदनीय अनागारिक धमपाल यांची जयंती 17 सप्टेंबर 1864- श्रीलंकन (सिंहली) बौध्द पुनरुज्जीवक आणि लेखक होते. ते पहिले जागतिक बौद्ध धर्म प्रचारक होते ते अहिंसक सिंहली बौध्द राष्ट्रवादाचे संस्थापक आणि ब्रिटीश राजवटीविरुद्ध श्रीलंकेच्या स्वातंत्र्य चळवळीतीत अग्रणी व्यक्ती होते. बोद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी ते अग्रेसर होते आणि आशिया उत्तर अमेरिका आणि युरोप अशा तीन खंडात धर्म उपदेश करणारे ते आधुनिक काळातले पहिले बोद्ध होते. हेन्री स्टील ऑलकॉट आणि थेओसॉफिकल सोसायटीचे निर्माते हेलेना ब्लाव्हत्स्की यांच्या बरोबर ते श्रीलंकेतील सिंहली बौद्ध धम्माचे प्रमुख सुधारक आणि पुनरुज्जीवन करणारे आणि पश्चिमेकडील प्रसारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्ध्या  शतकापूर्वी तामिळ लोकांसह दक्षिण भारतीय दलितांच्या जन आंदोलनास त्यांनी प्रेरित केले होते.

       बौद्ध धर्मामुळे जोडल्या गेलेले संपूर्ण विश्वाचे संबंध केवळ साहित्यातच बंदिस्त होते. ते पुन्हा जोडले जावे यासाठी अनागारिक धम्मपाल प्रयत्नाची पराकाष्ठा करीत होते. त्यासाठी त्यांनी आशिया खंडाचा प्रवास करण्याचा निश्चय केला. त्यांनी ब्रह्मदेश, थायलंड, चीन, लाओस, कोरिया या पूर्वोत्तर देशांचा दौरा केला. या प्रचार अभियानात त्यांनी बुद्धभूमीकडे सर्वांचे लक्ष वेधले. त्यासोबत ते जागतिक पातळीवर त्या-त्या देशात शाखा उघडण्याचे कार्य करीत होते.

        शिकागो मध्ये भरलेल्या विश्वधर्म परिषद 27 सप्टेंबर 1893 मध्ये संपन्न झाली होती. अनागारिक धम्मपाल यांच्याद्वारे बौद्ध दर्शन यावर त्यांनी भाषण दिले. या परिषदेत  अनेक धर्माचे विद्वान लोक तिथे आले होते. या परिषदेत स्वामी विवेकानंदजी यांना अधिकृत निमंत्रण दिले नव्हते. परंतू  स्वामी विवेकानंदजी हे बुद्धाच्या भूमितून आल्यामुळे अनागरिक धम्मपाल त्यांच्या मित्राला त्यांनी आयोजकांना सांगून आपल्या भाषण करते वेळी त्यांच्या भाषणातला काही वेळ बोलण्यासाठी दिला होता. या धर्मपरिषदेमध्ये हिन्दू दर्शन वर स्वामी विवेकानंद यांनी भाषण केले. तेव्हापासून विवेकानंद धम्मपालांना अतिशय सन्मान देत होते. ही ऐतिहासिक परिषद संपली तरी धम्मपालांची भाषणे सुरूच होती. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी ऑकलँड व सेन् फ्रांसिस्को येथे भाषणे केली. त्यांनी तेथील लोकांना सुखी जीवनाच्या वाटचालीत बौद्ध धम्माचे स्थान स्पष्ट करून दिले.

   अनागारिक धम्मपाल यांनी आपल्या जीवनामध्ये 40 वर्षापर्यंत भारत श्रीलंका आणि विश्वातील अनेक देशांमधे बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसार केला. भारतातून लुप्त पावलेली पालि भाषा विद्यापीठात शिकविली जावी, यासाठी अनागारिक धम्मपालांनी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना 1807 साली मा. जस्टीस आशुतोष मुखर्जी यांच्या सहयोगाने यश आले आणि कलकत्ता विद्यापीठात पालि विषय मॅट्रीकपासून तर एम.. पर्यंत सुरू करण्यात आला. तत्पूर्वी नॅशनल कॉलेज कलकत्ता येथे धर्मानंद कोसंबी यांची पालि विषयाचे लेक्चरर म्हणून नियुक्ती झाली होती. पुढे धर्मानंद कोसंबींनी अहमदाबाद, मुंबई व इतर विद्यापीठात पाली भाषेच्या विषयाची सुरुवात केली. बौद्ध धम्माच्या अभ्यासाच्या दृष्टीने अनागारिक धम्मपाल  त्यांच्या सहयोगाचे फार मोठे कार्य होते.

     अनागारिक धम्मपाल यांच्या प्रभावी भाषणाने प्रभावित होऊन सिंहल, ब्रह्मदेश, चीन, लाओस व थायलंड या देशातील बौद्ध लोक बौद्ध तीर्थक्षेत्रांकडे धाव घेऊ लागले. बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर व लुंबिनी या पवित्र धर्मस्थाळांना भेटी देऊ लागले. या बौद्ध पर्यटकांच्या व्यवस्थेसाठी 1900 मध्ये मद्रास, कुशीनगर तसेच अनुराधापूर याठिकाणी शाखा उघडण्यात आल्या. या माध्यमातून बौद्ध देश व भारत यांचा सांस्कृतिक अनुबंध जुळू लागला. भारतात नवीन विहार निर्माण करण्यासाठी धम्मपालांनी नव्या वातावरणाची निर्मिती केली.

     आशिया खंडात अनागारिक धम्मपालांचा विद्यार्थ्यांना परिचय होताच त्यांना मनोविज्ञानावर बोलण्याची विनंती केली. त्यानुसार धम्मपालांनी अभिधम्माच्या सिद्धान्तावर एक भाषण केले. ते ऐकून विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. त्यानंतर विलियम जेम्स यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले की, “येणाऱ्या 25 वर्षानंतर संपूर्ण जगाला याच विज्ञानाचे शिक्षण घ्यावे लागेल. "

      डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या मते, 'धम्मपालजी एक व्यक्ती नव्हे तर आदर्श व्यक्तिमत्त्व होते. बुद्धगयेचे जगप्रसिद्ध महाबोधी विहार जोपर्यंत राहील, तोपर्यंत त्यांचे आदराने नामस्मरण केले जाईल.'

   भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी दिनी (14 ऑक्टोबर 1956) ज्या पूजनीय भदन्त चंद्रमणी महास्थविर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्या चंद्रमणींना ब्रह्मदेशातून भारतात आणण्याचे श्रेय देवमित्त अनागारिक धम्मपालांनाच जाते. त्यांचे कार्य भदन्त चंद्रमणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे चालविले आणि बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली त्याची पायाभरणी अनागारिक धम्मपाल यांनी केली होती. भारतामध्ये बौद्ध धर्मात पुनर्जीवित करणारे अनागारिक धम्मपाल यांचा मृत्यु 29-04-1933 मध्ये झाला.

                                                                                                                                                 प्राडॉ.सारिका विष्णू केदार

                           पालि विभाग प्रमुख

        पुण्यश्लोक अहिल्यादेवी

              होळकर  महाविद्यालय,

          राणीसावरगाव ता.गंगाखेड,

जिपरभणी

Friday, June 28, 2019

आंबेडकरपुर्व दलित शाहिरी


आंबेडकरपुर्व दलित शाहिरी

प्रस्तावना 

पारंपारीक पध्दतीने रचना करणारे अनेक दलित शाहिर आंबेडकरपुर्व कालखंडात होऊन गेले,पण दलितांचे दु: - वेदना,प्रश्नानांना वाचा फोडणारे शाहिर म्हणुन गोपाळबाबा वलंगकर आणि किसन फागु बनसोडे यांच्या शाहिरीचा या भागात उल्लेख महत्वपुर्ण ठरतो.सत्यशोधक जलशातुन प्रेरणा घेऊन या शाहिरांनी दलित वेदनांना वाचा फोडल्याचे दिसुन येते.

गोपाळबाबा वलंगकर

कोकणातील रावढळ हे गोपाळबाबा वलंगकरांचे जन्मगाव.ब्रिटीशांनी सुरू केलेल्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले.ब्रिटीश सैन्यात त्यांनी नौकरी केली.महात्मा जोतीबा फुल् त्यांचे समकालीन होते आणि त्यांचा सहवास त्यांना लाभला होता.महात्मा फुले यांच्या समतावादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.सैन्यातुन निवृत्त होताच त्यांनी समाजकार्यात वाहुन घेतले.त्यानी दापोलीत 'अनार्थ दोषपरिहार' नावाची संस्था स्थापन करून समविचारी मित्राचे संघटन बाधले.ब्राम्हण वर्चस्व झुगारल्याशिवाय आपनास गती नाही असे त्यांनी समाजास सागीतले आणि विवाह समारंभात ब्राम्हणांचे पुरोहीत्य नाकारले. अस्पृश्यता कशामुळे सोसावी लागत आहे, हे त्यांती बरोबर जाणले होते.गोपाळबाबानी महात्मा फुले प्रमाणेच हिंदुचे धर्मग्रथं आचारसंहितेवर तोफा डागल्या,त्या साठी त्यांनी हिंदुच्या धर्मग्रथांचा सुक्म अभ्यास तर केलाच होता,परतु इतर धर्मीचाही अभ्यास करून आपल्या कार्याला विचाराला बुद्धिप्रमाण्यवादाचे जोड दिली होती. त्यामुळे त्याची वैचारीक बैठक पक्की होती.म्हणुनच ते नुसते शाहिर,विचारवंत,कार्यकर्ते नव्हते,तर कर्ते सुधारक होते,असे म्हणावे लागते.गोपाळबाबानी विपुल प्रमाणात गिते रचली,गितांमधुन अस्पृश्यतेच्या मुपळावर घाव घालताना गुलामीची सवय झाल्याने निष्क्रिय होऊन बसलेल्या आपल्या समाजबांधवांबद्दल संताप व्येक्त केलेला दिसुन येतो.हा संताप त्यांना झोपेतुन जागे करण्यासाठी आहे.एका गितांत ते म्हणतात

पोटे जळतात तर सोद्यांनो काटेही भरा
पुर्वापर दु:खाची मनी आडवण करा !!

गोपाळबाबा आपल्या गितातुन ब्राम्हणावर,त्यांनी प्रस्तापित केलेल्या चातुर्वर्ण्यव्यवस्थेवर हल्ला करतात,तसेच हजारो वर्षापासुन अन्याय-अत्याचार निमुटपणे सहन करणारया अस्पुश्यांना ब्राम्हणांचे कपट ओळखण्याचे आवाहनही करतात.

हेच शास्त्रकर्ते हेच न्याय देते !
गुरु हेच होते पुर्वकाळी !!
म्हणुनी या नीचानी तुम्हा निच केले !
श्रेष्ठत्व आणिले आपणास !!!!
*****
ब्राम्हणेतरांनो विचार तुम्ही करा !
आभिमान धरा मानवाचा !!!!

आजची जी समाजव्यवस्था आहे.ती ब्राम्हणांनी लादली आहे,त्यांनी तुम्हाला निच ठरविण्याचा गुन्हा केलाय; पण आज अस्पृश्यांनी त्यांचा दहुटप्पीपणा ओळखायला हवा,त्याशिवाय अस्पृश्यांचा उध्दार होणार नाही,असे आवाहन गोपाळबाबानी या गितातुन केले आहे.गोपाळबाबानी आंबेडकरपुर्व काळात महात्मा जोतीबा फुले यांचा समतेचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गितरचना केली.त्यांच्या गितामधुन ब्राम्हणी वर्चस्व,हिंदुचे धर्मग्रंथ,वर्णव्यवस्था,जाती व्यवस्था आणि त्यामुळे अस्पृश्यांची झालेली दयनीय स्थिती या संबंधाचे हृदयविदारक विचार पाहावयास मिळतात. या गितामधुन ब्राम्हणीय वर्चस्व,चातुर्वर्ण्य व्यवस्थे विरूध्द चिड, संताप जसा व्येक्त होतो,तशीच ही अन्यायी व्यवस्था उलथवुन लावण्या संबंधीची भावना दिसुन येते.

किसन फागु बनसोडे

आंबेडकरपुर्व काळात गोपाळबाबा वलंगकरांनतर किसन फागु बनसोडे यांच्या कार्याचा उल्लेख महत्त्वपुर्ण ठरतो. नागपुर जवळचे मोहपा हे त्यांचे मुळ गाव. त्यांनी शैक्षणिक पात्रता असुनही नोकरी करता स्वत:ला समाजकार्यासाठी वाहुन घेतले.१९०९ मध्ये नागपुर येथे 'सन्मार्ग बोधक अस्पृश्य समाज' नावाने संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातुन विविध उपक्रम राबविले.'१९०७ साली नागपुरच्या पाचपावली भागात चोखामेळा मुलीची शाळा काढली.वसतीगृह,फिरते वाचनालय,नवसाक्षर प्रोढ वर्ग इतर अनेक शाळांच्या माध्यमातुन त्यांनी आपले कार्य तडीस नेहण्याचा प्रयत्न केला. १९०१ पासुनच त्यांनी शाहिरी लेखनाला सुरवात केली त्यांचा स्वत:चा जलसाही होता.एका साधुची फजिती 'पारतंत्र्य विमोचन' अथवा 'अंत्याज सुधारणेचा मार्ग',सनातन धर्माचा पंसमारोपतमाशा' आदी जलशांच्या माध्यमातुन समाजजागृतीचे काम केले.त्यांच्या गितातुन गुलामीची व्यथा सलताना दिसते. आपल्यावर आपल्या समाजावर लादलेल्या गुलामीबद्दल ते संताप व्येक्त करतात.

थु; तुमच्या तोंडावर लेक होss
कसले वतनदार,महार तुम्ही,कसले वतनदार
वतनदाराची बघा लेकरे फिरती दारोदारी !!
धरूनी काठी,खेडर हाती
परी एेट झाकदार दावता तुम्ही
जोहर ना करी त्या मारी पाटिल खेटर तोडावरी !!

*****

गुरे ओढणे लाजिरवाणे
धिक् हा संसार तुमचा रे
उच्छिष्टाची आस सदा धड मिळेना भाकर

******

अंगण झाडणे, केर फेकणे
नित्याचा व्यवहार तुमचा रे
ह्या कामगिरीचे हक्क केवढे, उष्टे तुकडे चार

अस्पृश्यतेचे चटके सहत गावकीची कामे निमुटपणे करीत असलेल्या आपल्या समाजबांधवाबद्दल या गितातुन चिड व्येक्त झालेली दिसुन येते,पण ही चिड त्यांना जागृत करण्याच्या उद्देशाने व्येक्त झालेली आहे.ही हीन कामे सर्वांनी सोडुन द्यावीत असे आवाहनच या गितात आहे.शाहीर बनसोडे अन्य एका गितात म्हणतात......

दलित बांधवा जाण रे
समजुन घे ही खुण रे
भटपाशातुन मुक्त व्हाया
कर काही तरी यत्न रे १०

भट,ब्राम्हणांनी तुमच्यावर ही गुलामी लादलेली आहे आणि यातुन मुक्त होण्यासाठी तुमचे तुम्हाला स्वत;लाच प्रयत्न करावे लागतील, असा संदेश या गितातुन वेक्त होत आहे. दलित समाज अदन्यान अधंकारात खितपत पडलेला असल्यामुळे ही गुलामी पिढ्यानपिढ्यांपासुन सुरु आहे.ती झुगारून द्यायची असेल तर शिक्षणाशिवाय अन्य उपाय नाही,असे ते पुढील गितात सांगत आहेत.....

ऊठ शिक तातडी,बाराखडी,खडी तालीम सोड आता धर स्वाभिमान मिळवी मान,
 अपमान चुकवी तु पुरता११

शिक्षणामुळे स्वाभिमान जागृत होतो,समाजात मान-सन्मान मिळतो. म्हणुन शिक्षणाचा मार्ग त्वरीत अवलंबावा,असे आवाहन या गितातुन त्यांनी केले आहे. किसन फागु बनसोडे यांच्या गितांतुन 'दलित धगधगत्या अंत;करणाचे प्रतिबिंब १२ उमटलेले दिसुन येते.

समारोप

डॉ,बाबासाहेब आंबेडकरांच्या उदयापुर्वी दलित समाज अदन्या-अंधकाराच्या गर्तेत अडकलेले होता,अंधरूढी-प्रथा आणि अनिष्ट चालीरीतींनी त्याला जखडुन ठेवले होते, गोपाळबाबा वलंगकर आणि किसन फागु बनसोडे यांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधकीय जलशातुन प्रेरणा घेऊन, गिते आणि जलशाच्या माध्यमातुन वर्णव्यवस्था,जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता यांचे उच्चाटन करन्याची पायाभरनीस सुरुवात केली आणि दलित समाजाच्या वेदनेला वाचा फेडली असे म्हनावी लागेल.

संदर्भ
डॉ,पानतावणे गंगाधर,'वादळाचे वंशज', प्रचार प्रकाशन नागपुर,१९८२,पृष्ट
डॉ, मेश्राम योगेद्रं,' दलित साहित्य : उद्गम आणि विकास',श्री मंगेश प्रकाशन,नागपुर,पृष्ट १०६
३डॉ, किरवले कृष्णा,'आंबेडकर शाहिरी:एक शोध', नालंदा प्रकाशन औरंगाबाद,पृष्ट २३
डॉ पानतावणे गंगाधर,अस्मितादर्शन- दिवाळी अंक १९८५ (लेख गोपाळबाबा वलंगकर यांची .काव्य रचना) पृष्ट १२०
कित्ता-१२०
डॉ,किरवले कृष्णा,'आंबेडकर शाहिरी: एक शोध' नालंदा प्रकाशन औरंगाबाद, पृष्ट ५५
कित्ता - ५६
कित्ता - ५६
कित्ता - ५८
१० कित्ता - ५८
११ डॉ, पानतावणे गंगाधर,'विद्रोहाचे पाणी पेटले आहे', विजय प्रकाशन नागपुर,२००४,पृष्ट ५९
१२ कित्ता - ७८