अनागारिक धम्मपाल आणि पाली दिवस
17 सप्टेंबर रोजी 'पालि भाषा गौरव दिनं' अर्थात पालि भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. अनागारिक धम्मपाल यांची 159 वी जयंती आहे. अनागारिक धम्मपाल यांच्या जयंती निमित्त 'पालि डे' हा दिवस साजरा केला जातो. अनागारिक धम्मपाल यांचा जन्म 17 सप्टेंबर 1864 मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे झाला ते अत्यंत श्रीमंत कुटुंबातील होते. त्यांचे लहानपणीचे नाव डॉन डेव्हीड असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव डॉन केरोलिस हेवावितरणे व आईचे नाव मल्लिका धर्मागुणवर्धने असे होते. डॉन डेव्हिड यांच्या बालजिवनाला आधार देण्यासाठी त्यांची आई मल्लिका देवी रात्रंदिवस झटत होती. व ती बौद्ध संस्कृतीला मानत होती. डॉन डेव्हिड हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते त्यांनी शाळेत उत्तम प्रगती केली होती. मल्लिका देवी स्वतः नित्यनेमाने बौद्ध धर्माचे धडे देऊन डॉन डेव्हीड यांचे जीवन घडवित होती. त्याच्या नैतिक आचरणावर ख्रिश्चन शाळेतील अध्यापक वर्ग अगदी खुश होता. बायबलवर डेव्हीडचे प्रभुत्व असल्यामुळे त्या शाळेतील अध्यापक वर्ग त्यास मोठ्या प्रेमाने प्रार्थनेत सहभागी करून घेत असत. त्याचे उच्चार अगदी सुस्पष्ट आणि वाणीत मधुरता होती. डॉन डेव्हीडने बायबल पाठ केले असले तरी त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर कधीच पडला नाही.
डॉन डेव्हीड
यांच्या सुरवातीच्या जीवनात मेडम मेरी ब्लवत्सकी आणि कर्नल हेनरी ऑलकॉट यांचे खूप मोठे योगदान आहे.
सन 1875 मध्ये मेरी ब्लवत्सकी आणि कर्नल हेनरी
ऑलकॉट यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये थियोसोफिकल सोसायटीची या दोघांनी बौद्ध धर्माचे
खूप अध्ययन केले नंतर 1880 मध्ये ते श्रीलंका येथे आल्यावर ते
स्वतः बुध्दिष्ट झाले तसेच भिक्षुंचे चिवरही यांनी धारण केले. ( भिक्षु झाले ) त्यांनी श्रीलंकेत 300 च्या वर शाळा काढल्या. बौद्ध धर्मातील शिक्षणासाठी फार
मोठे काम त्यांनी केले. डेव्हिड त्यांच्यामुळे खूप प्रभावित झाले.
बालक डेविड यांना पालि शिकण्याची प्रेरणा त्यांच्यामुळेच मिळाली त्यानंतर
डेव्हिड ने आपले नाव बदलून 'अनागारिक धम्मपाल' असे ठेवले. 1891 मध्ये अनागारिक धम्मपाल यांनी भारतात
स्थित बोधगया महाविहाराची यात्रा केली होती. जिथे सिद्धार्थ गौतमाला
बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती. संपूर्ण भारताचे अवलोकन त्यांनी
केले. भारताची बौद्धधम्म आणि बौद्ध तीर्थ स्थळांची दुर्दशा पाहून
यांना खुप दुःख झाले. त्यांनी विश्वातील काही बौद्ध
देशात पत्र लिहून त्यांनी सन 1891 मध्ये
महाबोधि सोसायटीची स्थापना केली. धम्मपाल यांनी महाबोधि विहार
तसेच दुसरे तीन प्रसिध्द बौद्ध स्थळ स्थापन करणासाठी मागणी केली होती त्याचाच परिणाम
कि आज महोबाधि विहारामध्ये बौद्ध लोक जाऊ शकत आहेत. तसेच अनागारिक
धम्मपाल यांचा प्रयास होता की, कुशीनगर जिथे तथागत यांचे महापरिनिर्वाण
झाले होते. तिथे सुद्धा बौद्ध दर्शनीय स्थळ बनले.
बौध्द धम्माचा
प्रचार व प्रसार करून धम्म पूनरर्जीवीत करणारे वंदनीय अनागारिक धमपाल यांची जयंती
17 सप्टेंबर 1864- श्रीलंकन (सिंहली) बौध्द पुनरुज्जीवक आणि लेखक होते. ते पहिले जागतिक बौद्ध धर्म प्रचारक होते ते अहिंसक सिंहली बौध्द राष्ट्रवादाचे
संस्थापक आणि ब्रिटीश राजवटीविरुद्ध श्रीलंकेच्या स्वातंत्र्य चळवळीतीत अग्रणी व्यक्ती
होते. बोद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी ते अग्रेसर होते आणि
आशिया उत्तर अमेरिका आणि युरोप अशा तीन खंडात धर्म उपदेश करणारे ते आधुनिक काळातले
पहिले बोद्ध होते. हेन्री स्टील ऑलकॉट आणि थेओसॉफिकल सोसायटीचे
निर्माते हेलेना ब्लाव्हत्स्की यांच्या बरोबर ते श्रीलंकेतील सिंहली बौद्ध धम्माचे
प्रमुख सुधारक आणि पुनरुज्जीवन करणारे आणि पश्चिमेकडील प्रसारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व
होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्ध्या शतकापूर्वी तामिळ लोकांसह दक्षिण
भारतीय दलितांच्या जन आंदोलनास त्यांनी प्रेरित केले होते.
बौद्ध
धर्मामुळे जोडल्या गेलेले संपूर्ण विश्वाचे संबंध केवळ साहित्यातच बंदिस्त होते.
ते पुन्हा जोडले जावे यासाठी अनागारिक धम्मपाल प्रयत्नाची पराकाष्ठा
करीत होते. त्यासाठी त्यांनी आशिया खंडाचा प्रवास करण्याचा निश्चय
केला. त्यांनी ब्रह्मदेश, थायलंड,
चीन, लाओस, कोरिया या पूर्वोत्तर
देशांचा दौरा केला. या प्रचार अभियानात त्यांनी बुद्धभूमीकडे
सर्वांचे लक्ष वेधले. त्यासोबत ते जागतिक पातळीवर त्या-त्या देशात शाखा उघडण्याचे कार्य करीत होते.
शिकागो
मध्ये भरलेल्या विश्वधर्म परिषद 27 सप्टेंबर 1893 मध्ये संपन्न झाली होती. अनागारिक धम्मपाल यांच्याद्वारे
बौद्ध दर्शन यावर त्यांनी भाषण दिले. या परिषदेत अनेक धर्माचे विद्वान लोक तिथे आले
होते. या परिषदेत स्वामी विवेकानंदजी यांना अधिकृत निमंत्रण दिले
नव्हते. परंतू
स्वामी विवेकानंदजी हे बुद्धाच्या भूमितून आल्यामुळे अनागरिक
धम्मपाल त्यांच्या मित्राला त्यांनी आयोजकांना सांगून आपल्या भाषण करते वेळी त्यांच्या
भाषणातला काही वेळ बोलण्यासाठी दिला होता. या धर्मपरिषदेमध्ये
हिन्दू दर्शन वर स्वामी विवेकानंद यांनी भाषण केले. तेव्हापासून
विवेकानंद धम्मपालांना अतिशय सन्मान देत होते. ही ऐतिहासिक परिषद
संपली तरी धम्मपालांची भाषणे सुरूच होती. लोकांच्या आग्रहास्तव
त्यांनी ऑकलँड व सेन् फ्रांसिस्को येथे भाषणे केली. त्यांनी तेथील
लोकांना सुखी जीवनाच्या वाटचालीत बौद्ध धम्माचे स्थान स्पष्ट करून दिले.
अनागारिक
धम्मपाल यांनी आपल्या जीवनामध्ये 40 वर्षापर्यंत भारत श्रीलंका
आणि विश्वातील अनेक देशांमधे बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसार केला. भारतातून लुप्त पावलेली पालि भाषा विद्यापीठात शिकविली जावी, यासाठी अनागारिक धम्मपालांनी प्रयत्न केला. त्यांच्या
प्रयत्नांना 1807 साली मा. जस्टीस आशुतोष
मुखर्जी यांच्या सहयोगाने यश आले आणि कलकत्ता विद्यापीठात पालि विषय मॅट्रीकपासून तर
एम.ए. पर्यंत सुरू करण्यात आला.
तत्पूर्वी नॅशनल कॉलेज कलकत्ता येथे धर्मानंद कोसंबी यांची पालि विषयाचे
लेक्चरर म्हणून नियुक्ती झाली होती. पुढे धर्मानंद कोसंबींनी
अहमदाबाद, मुंबई व इतर विद्यापीठात पाली भाषेच्या विषयाची सुरुवात
केली. बौद्ध धम्माच्या अभ्यासाच्या दृष्टीने अनागारिक धम्मपाल त्यांच्या सहयोगाचे फार मोठे कार्य
होते.
अनागारिक
धम्मपाल यांच्या प्रभावी भाषणाने प्रभावित होऊन सिंहल, ब्रह्मदेश,
चीन, लाओस व थायलंड या देशातील बौद्ध लोक बौद्ध
तीर्थक्षेत्रांकडे धाव घेऊ लागले. बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर व लुंबिनी या पवित्र धर्मस्थाळांना भेटी
देऊ लागले. या बौद्ध पर्यटकांच्या व्यवस्थेसाठी 1900 मध्ये मद्रास, कुशीनगर तसेच अनुराधापूर याठिकाणी शाखा
उघडण्यात आल्या. या माध्यमातून बौद्ध देश व भारत यांचा सांस्कृतिक
अनुबंध जुळू लागला. भारतात नवीन विहार निर्माण करण्यासाठी धम्मपालांनी
नव्या वातावरणाची निर्मिती केली.
आशिया
खंडात अनागारिक धम्मपालांचा विद्यार्थ्यांना परिचय होताच त्यांना मनोविज्ञानावर बोलण्याची
विनंती केली. त्यानुसार धम्मपालांनी अभिधम्माच्या सिद्धान्तावर
एक भाषण केले. ते ऐकून विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. त्यानंतर विलियम जेम्स यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले की,
“येणाऱ्या 25 वर्षानंतर संपूर्ण जगाला याच विज्ञानाचे
शिक्षण घ्यावे लागेल. "
डॉ.
भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या मते, 'धम्मपालजी
एक व्यक्ती नव्हे तर आदर्श व्यक्तिमत्त्व होते. बुद्धगयेचे जगप्रसिद्ध
महाबोधी विहार जोपर्यंत राहील, तोपर्यंत त्यांचे आदराने नामस्मरण
केले जाईल.'
भारतीय
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी
दिनी (14 ऑक्टोबर 1956) ज्या पूजनीय भदन्त
चंद्रमणी महास्थविर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्या चंद्रमणींना ब्रह्मदेशातून भारतात आणण्याचे श्रेय देवमित्त अनागारिक धम्मपालांनाच
जाते. त्यांचे कार्य भदन्त चंद्रमणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे चालविले आणि बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली
त्याची पायाभरणी अनागारिक धम्मपाल यांनी केली होती. भारतामध्ये
बौद्ध धर्मात पुनर्जीवित करणारे अनागारिक धम्मपाल यांचा मृत्यु 29-04-1933 मध्ये झाला.
प्रा. डॉ.सारिका विष्णू केदार
पालि विभाग प्रमुख
पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर महाविद्यालय,
राणीसावरगाव ता.गंगाखेड,
जि. परभणी
No comments:
Post a Comment