भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांसाठीच लढा पुकारला नाही तर तो समस्त मानवजातीसाठी पुकारला. आंबेडकर हे विचारवंताचे विचारवंत होते मात्र येथील तथाकथित लोकांनी त्यांना जातीपलिकडे पाहिले नाही. त्यामुळेच त्यांचे राष्ट्रीय कार्य झाकोळले गेल्याची खंत खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी आज ‘संविधान गौरव दिनी’ व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब इन्स्टिट्यूट ऑफ सोशल ऍन्ड इकॉनॉमिक चेंज, या संस्थेच्यावतीने बाबासाहेबांच्या ‘ऍनिहिलेशन ऑफ कास्ट’ अर्थात ‘जातीप्रथेचे विध्वंसन’ या ऐतिहासिक ग्रंथाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त त्यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांना माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रासाठी अनेक कार्य केले. देशात रूढ असलेल्या जातीप्रथेविरूद्ध महात्मा फुले यांच्यानंतर लढा देण्याचे काम खर्या अर्थाने बाबासाहेबांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीतील ३७ वर्षे जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि उच्चाटन करण्यासाठी घालवले. देशात आंबेडकर अनुयायी महिनाभर भीमजयंती साजरी करतात. मात्र इतर लोक त्यापद्धतीने करत नाहीत. देशात सुरू असलेला जातीवाद बाबासाहेबांना कधीच मान्य नव्हता. एकदा बाबासाहेबांना जातपातक तोडक मंडळाने एका वार्षिक अधिवेशनात अध्यक्षपद देऊन भाषणासाठी बोलावले. मात्र बाबासाहेबांना जाती व्यवस्थेवर बोलण्यास मज्जाव केला. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना स्पष्टपणे निक्षूण सांगितले की ‘मला अध्यक्ष करा असे मी तुम्हाला सांगितले नाही, त्यामुळे मी माझे भाषण बदलणार नाही. माझं अध्यक्ष भाषण झालं नाही तरी चालेल पण मी भाषणाचा एक स्वल्पविरामही बदलणार नाही. त्यानंतर ते भाषण प्रसिद्ध करण्यात आले. या भाषणावर महात्मा गांधी यांनी डॉ. आंबेडकर हे हिंदू धर्माला आव्हान आहे अशी टीका केली होती अशी आठवणही त्यांनी उपस्थितांना करून दिली. जातीव्यवस्था ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यामुळे जाती निमुर्लन झाले तर देशाची प्रगती होईल. आज अनेक ठिकाणी समाजात समानता असल्याचे दाखवण्यात येते. त्यासाठी खान-पान, पार्ट्या , राहणीमान एकमेकांच्या धर्माविषयी आदर असल्याचे दाखविले जाते मात्र ज्यावेळी लग्नाचा विषय निघतो त्यावेळी त्याची सर्वात आधी ‘जात ’पाहिली जाते. देशातील जातीनिमूर्लन कायमचे नष्ट करायचे असेल तर त्यासाठी आज मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. राज्यात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान गौरव दिन’ म्हणुन साजरा करण्यात येतो. मात्र या दिवशी चौथा शनिवार आल्याने प्रशासनाने एका परिपत्रकाद्वारे हा गौरव आदल्या दिवशी साजरा करण्याचे ठरवल्याने अनेक ठिकाणी गोंधळ पाहावयास मिळाला. ‘संविधान गौरव दिन’ आदल्या दिवशी साजरा करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न मुणगेकर यांना विचारला असता ते म्हणाले की, मला याबाबत माहित नाही. पण ‘संविधान गौरव दिन’ साजरा करणारे देशातील महाराष्ट्र राज्य हे एकमेव आहे. गेल्यावर्षी हा दिवस २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करण्यात आला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली. अण्णा हजारे आणि शरद पवार प्रकरणावरही त्यांनी आपले मत मांडले. अण्णा हजारे यांनी चालवलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांचे आपण वैयक्तीकरित्या समर्थन करतो पण अण्णा हजारे यांनी चालवलेली माझेच ऐका ही आडमुठेपणाची भुमिका आपल्याला मान्य नाही. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर माथेफिरूने केलेला हल्ला हा दुर्दैवी असून त्याचा आपण निषेध करत असल्याचे सांगितले. राज्यात येऊ पाहणारे खाजगी विद्यापीठ हे गरीब विद्यार्थ्यासाठी नुकसानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
Saturday, June 27, 2015
Friday, June 19, 2015
बाबासाहेब आणि वैवाहिक जीवन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची वर्षे अत्यंत हलाखिमध्ये व गरिबीत गेली. त्यांच्या पत्नी रमाबाई मोठ्या उदार मनाच्या व पतीला सदोदित साथ देणार्या होत्या. दलित-बहुजन समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेल्या अथक संघर्षामुळे बाबासाहेब स्वता:च्या प्रपंचाकडे फारसे लक्ष देऊ शकले नाहीत. पण, आपल्या पत्नीवर त्यांचे अपार प्रेम होते. बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई व त्यांचे ३५ वर्षांचे सहजीवन, रमाबाईंनी आपल्याला सांभाळले, कुटुंबवत्सल असलेले बाबासाहेब समाजाच्या हितासाठी किती तळमळत होते आणि त्यामुळे त्यांची कुचंबणा कशी होत होती, याची सारखी जाणीव त्यांना राहत होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कुटुंबीयांसह "राजगृह' या आपल्या सुंदर व प्रशस्त वास्तूत राहण्यास आले होते. डॉ. आंबेडकरांनी तीन-तीन खोल्यांचे दोन ब्लॉक्स राजगृहाच्या तळमजल्यावर बांधून घेतले होते. त्या दोन ब्लॉक्समध्ये त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर डॉ.बाबासाहेबांनी स्वत:च्या राहण्याच्या सोयीबरोबरच आपल्या प्रिय ग्रंथालयाची आणि कार्यालयाचीही सोय केली होती. त्यांनी स्वत: आराखडा तयार करून त्याप्रमाणे सोयी करून घेतल्या होत्या.
आर्थिक स्थिती थोडी बरी झाल्यामुळे १९३० मध्ये त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीत ९९ आणि १२९ क्रमांकांचे प्लॉट विकत घेऊन ठेवले होते. त्यांनी पाचव्या गल्लीतील १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर आपल्या कुटुंबीयांबरोबर राहण्यासाठी इमारत बांधण्याचे ठरविले होते. आणि तिसर्या गल्लीतील ९९ क्रमांकाच्या प्लॉटवर भाड्याने देण्यासाठी इमारत बांधण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले होते. त्यांनी १९३१ च्या जानेवारी महिन्यात १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर राहण्याच्या वास्तूचे बांधकाम सुरू केले. ते बांधकाम १९३३ मध्ये पूर्ण होऊन "राजगृह' ही राहण्याची वास्तू तयार झाली. प्लॉट क्रमांक ९९ वर दुसर्या इमारतीचे बांधकाम १९३२ मध्ये सुरू झाले. ते बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांनी त्या इमारतीचे नाव "चार मिनार' असे ठेवले. "राजगृह' हे नाव हिंदू संस्कृती आणि बौद्ध संस्कृतीशी संबंधित होते, तर "चार मिनार'हे नाव मुस्लिम संस्कृतीशी संबंधित होते. पुढे ग्रंथांच्या खरेदीच्या आणि इतर गोष्टींच्या कर्जाची फेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी त्यांनी "चार मिनार' ही इमारत विकली. मात्र "राजगृह' ही वास्तू त्यांनी कायम आपल्या मालकीची ठेवली.
"राजगृह' या आपल्या मालकीच्या प्रशस्त वास्तूत राहण्यास आल्याचा रमाबाईंना व सर्वांनाच अतिशय आनंद झाला. ते सर्व जण पोयबावाडीच्या चाळीतील भाड्याच्या खोल्यांतून आपल्या स्वत:च्या राजगृहात राहण्यास आले होते, याचा त्यांना अत्यानंद होणे स्वाभाविक आहे! त्या अत्यानंदातही रमाबाई पोयबावाडीच्या चाळीतील स्त्रियांना कधी विसरल्या नाहीत. रमाबाई आपुलकीने त्या स्त्रियांना भेटण्यास जात असत आणि त्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देत असत. रमाबाई म्हणजे मूर्तिमंत माणुसकीच होत्या. प्रेमळ व कष्टाळू रमाबाई आपुलकीने माणसे जोडण्यात आणि समाजसेवेला पूर्णपणे वाहून घेतलेल्या आपल्या प्रिय पतीच्या पाठीशी मोठ्या विश्वासाने खंबीरपणे उभे राहण्यात पारंगत होत्या. हा त्यांचा सद्गुणच त्यांच्या संसाराचा भक्कम आधार होता!
डॉ. आंबेडकर आपल्या संसाराची, पत्नी रमाबाई, भावजय लक्ष्मीबाई, मुलगा यशवंत आणि पुतण्या मुकुंद यांची काळजी घेत असत. रमाबाई व यशवंत यांच्या आजारपणाकडे आणि औषधोपचारांकडेही त्यांचे लक्ष असे; परंतु समाजसेवेच्या कार्यातून त्यांना घरच्यांसाठी जास्त वेळ देता येत नव्हता, ही त्यांची व्यथा होती. ते घरच्यांना खर्चासाठी पुरेसा पैसाही देऊ शकत नव्हते. ते विचार करीत होते, की मुंबईतील सरकारी लॉ कॉलेजचे प्राचार्यपद जर आपल्याला मिळाले, तर आपली आर्थिक स्थिती थोडी सुधारेल. ते त्यासाठी १९३२ पासूनच प्रयत्न करीत होते. पण मे १९३५ पर्यंत त्यांना त्या प्रयत्नांत यश मिळाले नाही. तरी पण त्यांचा प्रयत्न चालूच होता. अशा वेळी काळाने त्यांच्या संसारावर अतिशय दु:खद आघात केला.
१९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाबाईंचा आजार वाढतच चालला होता. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाबाईंच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाबाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वत: बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाबाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. २६ मे १९३५ रोजी सकाळच्या नऊ वाजण्याच्या वेळेस रमाबाईंचे दु:खद निधन झाले आणि बाबासाहेबांवर दु:खाचा फार मोठा आघात झाला! जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले! एक चिंताजनक प्रश्न निर्माण झाला होता, की डॉ. आंबेडकर आता आपले समाजसेवेचे व्रत चालू ठेवतात की सोडून देतात! पण त्या महामानवाने आपली प्रिय पत्नी रमाबाई यांच्या अंतरीच्या इच्छेचा मान राखला आणि अस्पृश्यांच्या व हिंदुस्थान या आपल्या देशाच्या भल्यासाठी आपले समाजसेवेचे व्रत चालूच ठेवले. आपले कोणतेही कर्तव्य असो, ते निष्ठेने करीत राहण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्तव्यपूर्तीचा आनंद अनुभवीत असत.
बाबासाहेबांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर.....!!!
त्यानंतर बाबासाहेबांनी १५ ऎप्रील १९४८ रोजी डॉ. सविता (शारदा) कबीर सोबत दुसरा विवाह केला, एवढेच लोकांना माहिती आहे. पण, हा विवाह कोणत्या परिस्थितीमध्ये केला याची माहिती मात्र लोकांना नाही. बाबासाहेबांचे आयुष्याच्या शेवटपर्यंत खाजगी सचिव असलेल्या नानक चंद रत्तू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या आठवणींच्या पुस्तकात या बाबतीत लिहिलेले आहे.
बाबासाहेब मुंबईला डॉ. माधव मावळंकर यांच्या दवाखान्यात १९४८ मध्ये दाखल झाले होते. तेव्हा त्यांनी मधुमेहाच्या आजारावर रोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे गरजेचे आहे असे बाबासाहेबांना सांगितले होते. तेव्हा तुमची शुश्रूषा करेल अश्या स्त्री सोबत तुम्ही एकतर लग्न करा किवा तुमच्या सोबत एखादी स्त्री परिचारिका म्हणून ठेवा अशी सुचना डॉक्टरांनी केली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की, “ माझ्या समाजातील सार्याच स्त्रिया मला बाबा म्हणतात. मी कुणाशी लग्न करु?”
अशावेळी डॉ. सविता कबीर बाबासाहेबांना भेटल्या. त्यांनी परिचारिका म्हणून बाबासाहेबांसोबत दिल्लीला येण्याची आणि तेथे त्यांची शुश्रूषा करीत महिनाभर राहण्याची तयारी दर्शवली.
बाबासाहेबांनी त्यांची सुचना मान्य न करता त्यांना लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी लिहिले की, “एखादी स्त्री माझी शुश्रूषा करण्यासाठी माझ्या जवळ असावी, याबद्दल तुम्ही जे विचार मांडले आहेत, ते मला मुळीच स्वागतार्ह वाटलेले नाहीत. या बद्दल मला माफ करा. मी कमालीच्या नैतिक आणि धार्मिक वातावरणात लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे अवांछनिय संबंधांची जाहीर चर्चा निर्मान होईल, असा प्रस्ताव तर सोडाच, पण साधा विचारही मी करू शकत नाही. सार्वजनिक जीवनातील माझी प्रतिमा स्वच्छ चारित्र्याचा आणि निष्कलंक नीतिमत्तेचा व्यक्ती या लौकिकावर उभी राहिलेली आहे. माझे शत्रू सुध्दा मला घाबरत असतील आणि माझा आदरभाव करत असतील, तर ते याच कारणाने! त्या लौकिकाला तडा जाण्याची जराही शक्यता ज्यात असेल, असे काहीही माझ्या हातून कदापिही घडणार नाही. माझी पत्नी गेली, तेव्हा मी अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. ती मोडावी लागली तर, मी विवाह करीन, पण कोणत्याही परिस्थितीत आणि विशेषत: घरात दुसरी कोणी स्त्री नाही, अशा वेळी परिचारिका किंवा साथीदार ठेवण्याची सूचना मी मुळीच मान्य करणार नाही.”
डॉ. कबीर आणि बाबासाहेब यांच्यात जवळपास चार महिने पत्रव्यवहार झाला. आपल्या पत्नी बद्दलच्या अपेक्षा व्यक्त करतानाच, त्यांनी स्त्रियांबद्दलचा आपला प्रचंड आदरभाव या पत्रात व्यक्त केला आहे. या बाबतीत त्यांनी दादासाहेब गायकवाड व त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन त्यांचे मत विचारात घेतले.
डॉ. कबीर आणि बाबासाहेब यांचा विवाह झाला. डॉ. सविता कबीर या माईसाहेब आंबेडकर म्हणून, बाबासाहेबांच्या जीवनात आल्या. निकोप चारित्र्याला जपणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे हे विलक्षण हिमालयाच्या उत्तुंग उंचीचे व्यक्तिमत्व होते...!
Thursday, June 18, 2015
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय आणि मार्ग
शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा ”
असे आपल्या समाज बांधवाना सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सवर्णांच्या जुलमान्विरुध उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर , विषमतेवर , धर्ममार्तंडांच्या वर्चस्वावर , समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांवर सदैव पुकारलेले युद्धच होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते. सामाजिक , राजकीय ,आर्थिक, शैक्षणिक , धार्मिक , पत्रकारिता , कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन-दलितांच्या , श्रमिकांच्या , विस्थापितांच्या , शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रद्य्नेचा संदेश दिला . गलितगात्र झालेल्या मनामनातुन समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले . समतेवर आधारित समाजरचना घडावी असे त्यांचे ध्येय होते .
शैक्षणिक ध्येय :
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे . शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश समाजाला सत्वाची जाणीव व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले . “ शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे , ते जो पिला तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही .” असे ते समाज बांधवाना सांगत . प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे , म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे ते सांगत . प्रथमिन शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे कि मुलगी किंवा मुलगा एकदा शाळेत दाखल झाले कि ते परिपूर्ण सुशिक्षित , माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत . शासनाने यासाठी लक्ष दयायला हवे . डॉ. बाबासाहेबांचे म्हणने होते कि , समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे . शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौधीकदृष्ट्या सशक्त होतो . व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो . प्रज्ञा , शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे . शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये , तर मुलांची मने सुसंकृत व गुणवत्तामय बनवावी . समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत, असे शिक्षण असावे . शला म्हणजे उत्तम नागरिक बनविणारे आहेत याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे . १९४६ साली पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले . राष्ट्रहिताचे व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय , असे ते मानीत .
सामाजिक ध्येय :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते . भ्रष्टाचार , अनीती ,अत्याचार , अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता . जातिभेदाच्या ते विरोधात होते . जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे , असे ते मानत . हि सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय अमज एकसंघ होणार नाही ., असे ते समजत . इ . स . १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृशतेविरुद्ध जागृत चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेतला . त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेश्यासाठी सार्वजनिक चळवळ व मोर्चे काढण्यास सुरवात केली . दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी ते दिवस-रात्र झटत राहिले . सवर्णांच्या मनात कधीतरी अस्पृशांबद्दल सदभावना जागृत होईल या आशेवर ते प्रयत्नशील होते . हिंदू धर्मात आपल्याला आदराची वागणूक मिळावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला . पाच वर्षापासून नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या जिकरीने लढा चालवीत होते . पण पाषानहृदयी हिंदुना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटले नाही . त्यांना दलित व अस्पृश्य जनता हि नेहमीच कुत्र्या-मांजरापेक्षाही खालच्या दर्जाची वाटे . नाशिकच्या लढ्यात सनातनवाद्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशापासून रोखण्यासाठी मोठी ताकद लावून लढा दिला . शेवटी सनातन्यांच्या अवमानी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे धर्मांतराचा .
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांची समाजात असलेली गुलामगिरी दूर केली . १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले कि स्वच्छता पाळा , सर्व दुर्गुणांपासून दूर राहा , मुलामुलींना शिक्षण द्या ,त्यांना महत्त्वाकांक्षी बनवा , त्यांचा न्यूनगंड दूर करा , अंधश्रद्धा नष्ट करा असा महत्वाचा उपदेश दिला .
राजकीय ध्येय :
इ . स . १९२० च्या दशकात आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले . जातीसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांना त्यांनी आपल्या टिकेचे लक्ष बनवले . दलितांसाठी त्यांनी नविन राजकीय आघाडी काढली . ८ ऑगस्ट १९३० साली मागास्वर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टीकोन लोकांसमोर जाहीर केला . मागास्वर्गीयांनी काँग्रेस आणि ब्रिटीश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत , असे त्यांनी सांगितले . त्यांनी मागास्वर्गीयांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली .
पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या . १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक ,राजकीय , कायदेशीर दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला . यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल तयार लार्ण्याचे महान कार्य हाती घेतले . पण काँग्रेस मधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांचा विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या आणि त्यांना आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले . आंबेडकरांचे हिंदुकोड बिल जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद , अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती . पण दुर्दैव भारताचे ! दुर्भाग्य हिंदू समाजाचे ! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्व:ताचा घात करून घेतला .
“ स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे व माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस ह्यांनी या देशातून नष्ट करून टाकले ! ” नऊ कोटी मुसलमानांना खुश करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळविण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे काहीही केले नाही . असे असताना सुद्धा देशाला स्वतंत्र मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानाची आणि जातिय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले . आंबेडकर म्हणाले जगातील कोणतीही सत्ता या देह्सातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे हे आज न उद्या मुसलमानांना कळल्यावाचून राहणार नाही . आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांचा दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय .
काँग्रेसशी असलेले पूर्वीचे सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली . “ मनुस्मृती जाळा म्हणून सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे! ” बाबासाहेबांच्या भाषणाच्यावेळी बाबासाहेबांच्या मुखातून जणूकाही भविष्याचे संविधानच बाहेर पडत होते . संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाची आचारसंहिताच लिहिली जात होती . बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर सभागृह टाळ्यांच्या कडकाडाटीने निनादून उठले . संपूर्ण सभागृहातील सदस्यांनी बाबासाहेबांच्या विद्वतेपुढे मानच झुकविली होती . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा शिल्पकार ठरविण्याचा बहुमान आम जनतेने बहाल केला आहे . डॉ. आंबेडकरांनी हि जबाबदारी , हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पाडले यात मला तिळमात्रही शंका नाही , म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत .
धार्मिक ध्येय :
आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती . आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठांचा होता . भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता . शुचिर्भुत वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता असते असे त्यांचे ठाम मत होते . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती ती अशी कि हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभुतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसांत भेद करतो . ज्या धर्मात स्वतंत्र्य , समता , बंधुता नाही त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही , म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे . बाबासाहेबांनी धर्मांतराच्या घोषणेनंतर सलग एकवीस वर्षे विविध धर्माचा सखोल अभ्यास केला . या काळात त्यांचा कौल बौद्ध धम्माकडे वळला . बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृशच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा त्यांचा ठाम निश्चय झाला होता . बाबासाहेबांना बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण , सदाचार , समता , स्वातंत्र्य व बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला आणि “साऱ्या भारताला मी बौद्धमय करीन ” अशी गगनभेदी भीमगर्जना केली . त्यांचे हे ध्येय आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे .
डॉ . आंबेडकर म्हणजे नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली . त्यांनी मनुष्यमात्रांच्या जीवनातील दुःख , दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले संपूर्ण ज्ञान , माहिती व बळ लावले आणि रंजल्या-गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या , शेतकरी , मजूर वर्गाच्या आणि पददलीतांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्यज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक उद्धारक आणि तारकशक्ती ठरते .
अशा या महामानवाचे कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठी सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय . डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय .
DR. AMBEDKAR HAD OBSERVED THAT ART. 370 SHALL DIE WITH THE TERMINATION OF J&K CONSTITUENT ASSEMBLY
Expressing strong condemnation of the statement of J&K Chief Minister, Mr. Omar Abdullah that, “The only way to abrogate it is by recalling the Constituent Jammu and Kashmir Assembly where the question of state’s accession with India can again be reopened.” Saying that Omar Abdullah has crossed the limits and the constitutional boundaries he is obliged to maintain after having taken an oath of allegiance to the Constitution of India while assuming the office of a Chief Minister in the state.
Prof. Bhim Singh felt that criminal silence maintained by the echelons of power in Delhi on the anti-national outburst of J&K Chief Minister shall be highly dangerous to the security of the state and the integrity of India. I wonder if there is any leader in the Central government and any other national leader who dare question Mr. Omar Abdullah on his highly provocative and anti-national remarks. The Central leadership kept quiet when Mr. Omar Abdullah challenged the very legality of the accession of J&K with the Union of India. The Central leadership kept quiet when he proclaimed on the floor of the House that J&K never merged with the Union of India. NPP Supremo expressed surprise and told Mr. Omar Abdullah to study the history of accession of J&K and the agreement he signed with Mr. Parathasarthy, representative of Mrs. Indira Gandhi, the then Prime Minister of India in 1975. After this agreement all chapters on State-Centre Relations were closed. Sheikh Abdullah became Chief Minister and his son Farooq Abdullah succeeded his father in 1982.
Article 370 was plugged in the Constitution of India as a temporary provision. The reason to bring in Article 370 was to curtail the powers of Maharaja Hari Singh who still was recognized by the Constituent Assembly as the Monarch. Why this different kind of jurisprudence was allowed to exist vis-à-vis Jammu and Kashmir when all other states (nearly 556 of them) had signed a similar kind of Instrument of Accession. This was most intriguing, which Prof. Bhim Singh has pointed out in his book as one of the unforgivable blunders of the Constituent Assembly. According to Article 370 the power to legislate in respect of J&K has been vested in the President of India. The ridder that scuttles the whole proposition is a threat to the integrity of the country. The President of India was empowered to extend the application of the provisions of the Constitution of India to J&K by a Presidential Order issued by him (but) in concurrence with the State government of J&K constituted by the Maharaja. The Parliament of India has been disarmed to make any law vis-à-vis J&K. There are two essential ingredients which deserved special attention of the students of law. First that the President would need the concurrence of the government of J&K constituted by the Maharaja. Secondly in case any amendment to be made in any provision of Article 370, it would require recommendation (recommendation) of the Constituent Assembly of J&K. This would make explicitly cleared that the provisions inserted in Article 370 were applicable only during the existence of the J&K Constituent Assembly. The Constituent Assembly was dissolved with the introduction of J&K Constitution on 26th January, 1957. Mr. Omar Abdullah has stunned every political thinker and student of law by harping on the issue saying if Article 370 could only be abrogated by the Constituent Assembly of J&K. This shows his knowledge about a provision in the Constitution of India and the power of the so-called Constituent Assembly of J&K.
Prof. Bhim Singh while rebutting the statement of Mr. Omar Abdullah has advised him to seek legal opinion on his statement whether any provision in the Constitution of India can be amended by a State Legislature. Can the tale wag the dog?
Prof. Bhim Singh who is Barrister-at-Law and a Post Graduate in Law from London University and a Sr. Advocate in the Supreme Court of India observed that it is Parliament alone under Article 368 which has absolute power to amend any provision of the Constitution of India. Under Section 3 of J&K Constitution read with Article 1 of the Constitution of India, J&K (entire J&K) including POK, Gilgit-Baltistan is integral part of the Indian Union. This is the established stand of the Parliament of India which was notified to the whole world by the Parliament in its resolution in 1994 under the leadership of the then Prime Minister of India, Shri Narasimha Rao. Prof. Bhim Singh had taken this stand with superb support of the people of India that Article 370 needs to be amended so as to empower the Parliament to legislate in respect of J&K. The reorganization of J&K is the only way to resolve inter-provincial conflicts within J&K so that all the three regions of the state namely, Ladakh, Kashmir Valley and Jammu Pradesh shall enjoy equal legislative, administrative and financial rights.
Prof. Bhim Singh has given a call to all the state leaders to meet in the first week of January, 2014 in Srinagar or in Jammu to work out a joint strategy to oppose, expose and depose the corrupt, criminal and anti-national political parties like National Conference.

order abortion pill link order abortion pill online
Subscribe to:
Posts (Atom)